लखीमपूर खेरीच्या मैलानी येथील कोतवाली परिसरात राहणारा दहावीचा विद्यार्थी रजनीश कुमार याला एक महागडी बाईक घ्यायची होती. पण पैशांअभावी तो करू शकला नाही. मात्र, भंगारातून वस्तू खरेदी करून सुमारे ₹3000 ची जुगाड बाइक बनवण्यात तो यशस्वी झाला. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 120 किमी चालते, असा त्याचा दावा आहे.
10वीचा विद्यार्थी रजनीश कुमारने सांगितले की, त्याच्याकडे महागडी बाईक घेण्यासाठी पैसे नव्हते. पण, बाईक चालवायची खूप इच्छा होती, म्हणून स्वस्तात बाईक बनवावी म्हणजे शाळेत किंवा कुठेही जाणे सोपे जाईल असा विचार केला. यासाठी त्याने शेतात वापरले जाणारे पेट्रोलवर चालवणारे फवारणी करणारे मशीन भंगारातून खरेदी केलं.
त्याने भंगारातून ही मशीन खरेदी केली. त्याची मोटार काढली आणि ती दुरुस्त केली, मोटारसायकलचे काही सामान घेतले आणि सायकलमध्ये काही बदल करून ती मोटार त्यात बसवली. सुमारे 1 आठवड्याच्या मेहनतीनंतर त्याने त्या सायकलचे बाईकमध्ये रूपांतर केले. आता ही जुगाड बाईक ताशी 30 किलोमीटर वेगाने धावते आणि 1 लिटरमध्ये 120 किलोमीटरचा प्रवास करते.
पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थे
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. साहजिकच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं वाटतं होतं. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. याचे कारण म्हणजे खर्चात वाढ होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ न केल्याने सुमारे पाच महिने तोटा सहन करावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.